जळगावच्या एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसूंबा येथील एका तरुणीचा बालविवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पती, सासू, सासरे यांच्यासह तरुणीच्या आई-वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पुणे येथे राहणाऱ्या व मूळ कुसूंबा येथील रहिवासी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. तिचे सव्वा वर्षांपूर्वी तिच्या आई वडिलांनी शुभम कैलास राजपूत याच्याशी विवाह लावून दिला होता. तरुणी अल्पवयीन असतानाही पती शुभम राजपूत याने तरुणीशी संबंध ठेवले व एका अपत्याला जन्म दिला. पतीने एमआयडीसी येथील बैठक हॉल, प्रभा प्लास्टिक हॉल येथे व राहत्या घरी हे गैरकृत्य केले.
यामुळे तरुणीने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पती शुभम राजपूत, सासू वनिता कैलास राजपूत, सासरा कैलास नामदेव राजपूत, तरुणीचे उस्मानाबाद जिल्ह्यात राहणारे आई वडील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.