मेहरूणमधील तरुणीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : येथील मेहरूण भागामध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीला फेसबुकवर संपर्क साधून विश्वासात घेतले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्याच घरामध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इजाज इद्रिस खाटीक (वय, गाव माहिती नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे. डिसेंबर २०२२ मध्ये संशयित तरुणाने फेसबुकवर तरुणीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिच्या घरी येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.
पुन्हा एकदा ११ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देखील तिची इच्छेविरुद्ध त्याने बलात्कार केला. यावरून संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणाच्या मागावर पोलीस आहेत. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहेत.