चाळीसगाव ;- ११वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना परशुराम नगरात घडली. किर्ती भूषण गुंजाळ (रा. परशुराम नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बालिकेला विजेचा धक्का लागल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात ाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेमुळेे परीसरात हळहळ व्यक्त होत आहेत.