औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – सख्ख्या बहिणीवर दोन वेळा बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन भावाला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा थाठवली आहे हा प्रकार दडपण्यासाठी पीडितेला मारहाण करणाऱ्या आईला एक वर्ष कारावास आणि 32 हजार रुपये दंड सुनावला आहे. आई गावाला गेली असताना भावाने तिच्यावर अतिप्रसंद केल्याची तक्रार पीडितेने केली होती.
पीडित मुलीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 5 ऑगस्टरोजी तिची आई गावाला गेली होती. त्यावेळी पीडिता आणि तिचा भाऊ घरी होते. भावाने आपण काम करू, आईला सांगायचे नाही, नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यावर पीडितेने आईला सगळा प्रकार सांगितला. मात्र तुझी बदनामी होईल, कुणाला सांगू नको असे आईनेही धमकावले. 6 ऑगस्ट 2019 रोजी दुपाई आई दळण घेऊन गेली असता पुन्हा या 14 वर्षीय भावाने तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यावर पीडितेने पोट दुखत असल्याची तक्रार केली. मात्र आईने आता आणखी कुणाला सांगितले तर याद रख, असे धमकावत तिला मारहाण केली. पीडितेचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारील महिला गोळा झाल्या. पीडितेने त्यांना सगळा प्रकार सांगितला.
पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यात पीडितेची साक्ष, वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानुसार, न्यायालयाने भावासह आईला दोषी ठरवले. भावाला पोक्सोचे कल 4,5 (एल एन), कलम 6 नुसार, दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, आईला एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला.