जळगाव शहरातील बालाजीपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- आईच्या उपचारासाठी गेलेल्या कुटुंब दवाखान्यात असताना व घरी वृद्ध आजी असताना, चोरटयांनी संधी साधून आजीची नजर चुकवून घरातून चोरट्यांनी २१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने असा ५६ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २७ जून ते ४ जुलै दरम्यान बालाजीपेठेत घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश प्रभाकर पाटील (२४, रा. बालाजी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. बालाजीपेठेत राहणारे गणेश पाटील यांच्या आई आजारी असल्याने ते २७ जून रोजी उपचारासाठी दवाखान्यात गेले होते. आईच्या उपचारानंतर दि. ४ जुलै रोजी ते घरी आले. त्या वेळी दागिन्यांचा डबा गायब असल्याचे आढळून आले. पाटील हे उपचारासाठी गेलेले असताना त्यांच्या आजी घरीच होत्या. आजीची नजर चुकवून अज्ञात चोरटयांनी घरात घरफोडी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गणेश पाटील यांनी २ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील करीत आहेत.