पारोळा तालुक्यातील विटनेर येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विटनेर येथे बैलगाडीवर शेतात जात असताना खराब रस्त्यामुळे बैलगाडे तुटल्याने बसलेल्या ५९ वर्षीय महिलेचा पडून मृत्यू झाला असल्याची घटना दि. १४ रोजी घडली.
विटनेर येथे शेतीच्या कामासाठी चार ते पाच महिला सोनू सुखदेव अहिरे यांच्या बैलगाडीने शेतात जात होत्या. शेतरस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने अक्षय पाटील यांच्या शेतरस्त्याजवळ असलेल्या खड्ड्यात बैलगाड्याचे चाक गेल्याने गाड्याची चाक व लाकडी दांडा तुटला. बैलगाड्यात बसलेले चार-पाच जण फेकले गेले. त्यात आशाबाई दगडू वाघ (वय ५९) या दगडावर पडून मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनेची पारोळा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.