एरंडोल ( प्रतिनिधी ) – येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास 2 पिकअप वाहन धरणगावकडून नेरीकडे जात होते. या वाहनांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आला म्हणून त्यांनी पाठलाग करून त्यांना मरीमाता मंदिराच्या परिसरात थांबवून ड्रायव्हरची चौकशी केली. ड्रायव्हरने उडवाउडवीचे उत्तर दिले म्हणून झडती घेतली त्यामध्ये एका मालवाहू गाडीत चार व दुसऱ्या गाडीत तीन बैल निर्दयपणे बांधलेले होते.
त्यानंतर सकाळी सहावाजेच्या सुमारास टाटा मॅजिक 2 मालवाहतूक वाहनांमध्ये प्रत्येकी 2 असे चार बैल म्हसावद नाका परिसरातील अंजनी नदीच्या पुलावर पकडण्यात आले.असे 6 लाख रुपये किमतीचे 4 मालवाहतूक वाहन 1 लाख रुपये किमतीचे 11 बैल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.
एरंडोलच्या बजरंग दल शाखेचे कार्यकर्ते प्रकाश पाटील व सागर मराठे धरणगाव रस्त्याकडे जात असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली होती ही वाहने पकडण्यासाठी त्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते मुकेश भोई, शंतनू भेलसेकर, कुणाल ठाकूर, विवेक ठाकूर यांना बोलावले व एम एच 41 ए यु 0805 आणि एम एच 15 डी के 1212 ही बोलेरो पिकप मालवाहू वाहने पकडली वाहनांमध्ये 7 बैलांना दोराच्या साह्याने बांधून कत्तलीसाठी नेण्यात येत होते.
ही वाहने पोलीस स्थानकात जमा करीत असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन टाटा मॅजिक मालवाहतूक वाहने जाताना दिसली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या वाहनांचा पाठलाग करून म्हसावद नाक्या वरील अंजनी नदीच्या पुलावर एम एच 20 इ जी 6396 व एम एच 20 इ जी 4097 ही वाहने पकडली या दोन वाहनांमध्ये चार बैल बांधण्यात आले होते.
या चार वाहनांमधील ड्रायव्हर यांची नावे तुषार गोपाल (रा हाडाकेड, ता- शिरपूर, जि- धुळे ), राहुल गोसावी (रा अहिल्यापुर, ता- शिरपूर, जि – धुळे) , वसीम पटेल ( रा. कंडारी, ता – धरणगाव, जि – जळगाव) , शाहरुख रहीम पटेल ( रा कंडारी, ता – धरणगाव, जि – जळगाव ) या आरोपींवर प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या 5 अ,9, व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या 11 (1) (d) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
चोपडा , शिरपूर , धरणगाव मार्गाने दररोज रात्री गुरांची वाहतूक करणारी अनेक वाहने नेरीमार्गे औरंगाबादकडे जात असतात या मार्गावर पोलीस प्रशासनातर्फे रात्रीची गस्त वाढवून जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चोरी करून आणलेली गुरे याच मार्गाने जातात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
बजरंग दल शाखेच्या कार्यकर्त्यांमार्फत पोलीस निरीक्षक यांना अर्ज देण्यात आला या अर्जात म्हटले आहे की जप्त करण्यात आलेल्या अकरा बैलांची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, या बैलांना खोलवर जखमा झालेल्या आहेत व त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत व याचा अहवाल न्यायालयात सादर करणे जरुरीचे असल्यामुळे पशुवैद्यकीय यांचा अहवाल देण्यात यावा