जळगाव (प्रतिनिधी) – हिंदी भाषा दिवसाचे औचित्य साधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाचे आयोजन केले होते .


ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोषवाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धाचा यात समावेश होता.विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आनंददायी शिक्षणाचा आनंद अनुभवला. विद्यार्थ्यांनी हम सब का अभिमान हैं हिंदी, भारत की शान हैं हिंदी, एकता की जान है, हिंदी देश की शान है ,राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है अशा घोषवाक्याचे फलक तयार केले.पालकांनीही उपक्रमांचा आनंद घेतला.
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी हिंदी भाषा दिवसाचे महत्व सांगत उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देने महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. मुख्याध्यपक शोभा फेगडे यांनी पालकांना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपक्रमात सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहित करावे हे सांगितले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संध्या अट्रावलकर, संगीता गोहील, नम्रता पवार, अविदीप पवार, सारिका तडवी, रमेश ससाणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







