पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात व मुर्डेश्वरच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने बहुळा नदीला यंदाचा पहिलाच पूर आला आहे. नदीच्या पात्रालगतच आठवडी बाजार भरत असल्याने बाजारात बसण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी टेबल पुराच्या पाण्यात वाहून गेले.
बहुळा नदीचे उगमस्थान मुर्डेश्वरच्या खोऱ्यातून होत असल्याने व या बहुळा नदीला उंदरी व सुखी या २ नद्या मिळत असल्याने पाण्याची पातळी कमी वेळेत जास्त वाढते. मुसळधार पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, मका व फळपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. पावसाचे पाणी चांगले होत असल्याने काही भागांमध्ये विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसून येत आहे.