जळगाव ( प्रतिनिधी ) – तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बाहेती महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राज्यघटनेच्या उद्देशीकेचं सामूहिक वाचन करण्यात आले. प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांच्या सविधान जागृतीच्या संकल्पनेतून ‘भारतीय संविधान’ या संक्षिप्त स्वरुपातील पुस्तिकेचे विमोचन करण्यात आलं. प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत भारतीय राज्यघटनेविषयी माहिती, सरनामा, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे या संदर्भात संक्षिप्त स्वरुपातील माहिती समाविष्ट आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती दीपक पटवे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. पुस्तिकेच्या माहितीचे संकलन प्रा.गौतम भालेराव यांनी केले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र जनक्रांतीचे मुकुंद सपकाळे, साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल, प्रा.डॉ.सचिन पाटील, प्रा.डॉ. प्रदीप सुवाडकर, मुकुंदराव सपकाळे, कथाकार राहुल निकम, शिवराम शिरसाठ, कवी विजय लुल्हे, सुनील दाभाडे ,दीपक पटवे यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राहुल बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.मोरेश्वर सोनार यांनी केलं.