जळगाव (प्रतिनिधी ) ;-राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून जिल्ह्यातील १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश असून यात पूर्वी कार्यरत आणि सध्याचे नेमणुकीचे ठिकाण देत आहोत .
शासनाचे सहसचिव वि. ल. लहाने यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहे.
यात डॉ. गोविंद माधवराव पाटील हे ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथून ग्रामीण रुग्णालय अमळगांव जिल्हा जळगाव ,डॉ आशिष पाटील, हे ग्रामीण रुग्णालय अमळगांव जिल्हा जळगाव येथून ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे येत आहे. डॉ. पराग मधुकर पवार हे प्राथमिक आरोग्य केंद्र भादली जिल्हा जळगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद जिल्हा जळगाव येथून डॉ. अमित कुमार हरिभाऊ घडेकर प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्हा जिल्हा जळगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र रुई खेडा जिल्हा जळगाव , डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी प्राथमिक आरोग्य केंद्र साचले ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथून पारोळा तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून येत आहे. डॉ. बापू बाविस्कर हे ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथून खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येत आहे. डॉ. स्वप्नील डेसोरे हे उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथून जळगाव जिल्हा रुग्णालय , डॉ. दिलीप पोटोडे अमळनेर तालुका अधिकारी येथून प्राथमिक आरोग्य केंद्र नागरदेवळा ता. पाचोरा , डॉ. पि. के. ओसवाल हे प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव जिल्हा जळगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र नरवाडे ता. चाळीसगाव, डॉ. मीना अरुण दामोदर उपजिल्हा रुग्णालय ता. येवला येथून ग्रामीण रुग्णालय ता. पाचोरा येथे, डॉ. विनायक दिनकर महाजन प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा ता. पाचोरा ,डॉ. मोहन बाबूसिंग राठोड प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव जिल्हा जळगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र पातोंडा ता. अमळनेर जिल्हा जळगाव डॉ. नसीमा याकु ब तडवी प्रा आ कें सावखेडा जळगाव यांची ठाणे येथे ,डॉ.नम्रता मंगलचंद अच्छा ग्रामीण रुग्णालय मुक्ताईनगर येथून जळगाव जिल्हा रुग्णालय येथे बदली करण्यात आली आहे.