ठाणे येथील अधिकारी रोहन घुगे जळगावचे नवे जिल्हाधिकारी !
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रशासनाने बदली केली असून ते आता नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत. नवीन जिल्हाधिकारी म्हणून ठाणे येथील रोहन घुगे पदभार स्वीकारतील.
आज राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. रोहन घुगे हे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता ते जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आले आहे.









