जळगाव शहरात शिव कॉलनी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवकॉलनी येथे बांधकामाच्या ठिकाणाहून १५ हजार ५०० रूपये किंमतीच्या लोखंडी आसारींची चोरी झाल्याची घटना रविवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याबाबत रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन रामचंद्र नन्नवरे (वय ४५ रा. शिवकॉलनी, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरासमोर बांधकामासाठी लागणारे लोखंडी आसाराचे तुकडे ठेवण्यात आले होते. दरम्यान रविवारी ३ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते दुपारी ४ वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर ठेवलेले १५ हजार ५०० रूपये किंमतीचे लोखंडी आसारी चोरून नेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहे.