जळगाव एमआयडीसी भागात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बांधकाम सुरू असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ३७ हजार रुपये किमतीचे प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकचे साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

फिर्यादी सिमरन रमेश चेतवाणी (वय ४१, रा. कवलनगर, सिंधी कॉलनी, जळगाव) यांचे सर्व्हे नं. ५११ ते ५१४, टी.एम. नगर, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बांधकाम सुरू आहे. दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २९ डिसेंबर २०२५ च्या सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात दोन चोरट्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून एकूण ३७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी सिमरन चेतवाणी यांच्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि माधुरी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजयसिंग पाटील पुढील तपास करत आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.









