जळगाव शहरातील बिबा नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी असलेले वॉचमन दुसऱ्या साईटवर गेले असता, चोरट्याने त्याठिकाणाहून सेंट्रींग कामाच्या १६ लोखंडी प्लेट, १५ लोखंडी जॅक व ९ लोखंडी सोल्जर चोरुन नेले. ही घटना दि. ११ रोजी बीबा नगरात उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवीन पोस्टल कॉलनीत कैलास पंडीत भोळे हे वास्तव्यास असून ते कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांची राष्ट्रीय महामार्गावरील बिबा पार्क नगरलगत असलेल्या समांतर रस्त्याच्या रोडवरील पुलाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी मुरलीधर पाटील हे वॉचमन नियुक्त केले असून त्याठिकाणी देखरेख करीत असतात. दि. १० रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते हॉटेल साई पॅलेस समोरील बिबापार्कच्या ठिकाणी बांधकामाजवळ गेले असता, त्याठिकाणी बांधकामाचे साहित्य पडलेले होते. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास ते साईटवर गेले असता, त्याठिकाणी बांधकाम साहित्य दिसून आले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.