पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती
धरणगाव (प्रतिनिधी) :- आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील बाभळे व गारखेडा येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पाळधी येथील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भगवे रुमाल घालून प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. “शिवसेना म्हणजे फक्त राजकारण नाही, तर समाजाशी नाळ जपणारी, जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारी एक कुटुंबव्यवस्था आहे. तुम्ही सर्वजण संघटनात सक्रिय व्हा, गावोगावी आपल्या कार्याने शिवसेनेची पताका उंचवा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या काही वर्षांत केलेली विकासकामे, गावोगाव पोहोचलेली योजना आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. आता शिवसेनेच्या ध्येय-धोरणानुसार संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू.”
गारखेडा येथील प्रवेशकर्ते बाळकृष्ण प्रताप पाटील (चेअरमन, वि.का. सोसायटी), जगन्नाथ जगन महाजन (माजी चेअरमन, वि.का. सोसायटी), बळीराम भिवसान पाटील (संचालक वि.का. सोसायटी व माजी ग्रामपंचायत सदस्य), नामदेव काशीराम पाटील (संचालक सोसायटी), कैलास शिवराम पाटील (संचालक सोसायटी), बापू हरचंद पाटील (माजी संचालक सोसायटी), बंडू चुडामण पाटील, आनंदा गुलाब भील, प्रताप दगा पाटील, अमोल मधुकर पाटील, साहेबराव भागवत पाटील, अजय अधिकार पाटील, उमेश संजय महाजन, किरण लक्ष्मण पाटील, बाळकृष्ण काशीराम पाटील, अमोल कांतीलाल महाजन, वीरभान हरचंद पाटील, गोरख ताराचंद पाटील, सुनील गोकुळ पाटील, बाळू नामदेव महाजन यांनी प्रवेश केला.
बाभळे येथील सागर पाटील (राष्ट्रवादी तालुका संगटक), भुषण पाटील (उ.बा.ठा गट संगटक), जीजाबराव पाटील (माजी सरपंच), संतोष पाटील, जगदीश पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पाटील, वाल्मीक भास्कर पाटील, गुलाब पाटील, लीलाधर पाटील, संतोष देसले, अधिकार पाटील, राजेंद्र गजरे, गणेश पाटील, विनोद पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर शिरसोली प्र. न. येथील विशाल मोरे, विशाल भिल्ल, प्रशांत पवार, रवींद्र मालचे, अनिल मोरे, प्रविण मोरे, राजू भिल्ल, राजेंद्र भिल्ल, जितू भिल्ल, सोनू मालचे, अजय भिल्ल, विनोद भिल्ल, सोनू मोरे, हुसेन, संदीप, योगेश मोरे, विशाल मोरे, महेश भिल्ल, नितीन भिल्ल, जितू मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रवेश सोहळ्या प्रसंगी युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव नगरपालिकेतील माजी गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उद्योगपती वाल्मीक पाटील, बूट्या पाटील, युवा सेनेचे सोनुभाऊ महाजन, भानुदास भाऊराव पाटील (माजी सरपंच, बाभळे), कमलाकर पाटील (माजी संचालक, गारखेडे सोसायटी), जिजाबराव पाटील (माजी ग्रा.पं. सदस्य), भावेश पाटील (युवा सेना) यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास पाटील यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख विलास महाजन यांनी तर आभार माजी गट नेते पप्पू भावे यांनी मानले.