रावेर तालुक्यात भाविकांचा उत्साह
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर प्राणप्रतिष्ठेला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निंभोरा स्टेशन परिसरात प्रभू राम, लक्ष्मण, सीता, शबरी माता, हनुमानजी यांची सजीव केलेल्या आरास रथातून वाद्य वृंदसह भव्य मिरवणूक काढून महिलांनी व युवकांनी उत्साह साजरा केला.
सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांची पूजा करून सामूहिक आरती करून पूजन केले. या सजीव देखावा मध्ये मनस्वी अवचार, अक्षदा चौधरी, प्राजक्ता अवचार, अथर्व चौधरी, दिक्षा राठोड यांनी भूमिका पार पाडली. ही मिरवणूक स्टेशन परिसरात काढण्यात आली होती. याप्रसंगी मिरवणुकीस राजन लासुरकर, दुर्गादास पाटील, राजीव बोरसे, विजय सोनार यांनी भेट दिली. तसेच यावेळी निंभोरा स्टेशन येथील सुरेश बोरसे, सुरेश पाटील, प्रकाश टेकाडे, बन्सी राठोड, अंकुश राठोड, विनोद राठोड, मंगेश राठोड, जीवन राठोड, युवराज राठोड, लक्ष्मण पंजाबी, योगेश बोरसे, सागर चौधरी, मनोज अवचार, दुर्गेश अवचार, निलेश अवचार, निवृत्ती चौधरी, काशिनाथ बोरसे, लक्ष्मण पंजाबी, प्रशांत टेकाळे, संदीप चौधरी, सिताराम अंभोरे, पंकज अंभोरे, हरी पाटील, गजानन पाटील, नंदू चोपडे, गजानन महाजन, तुळशीराम महाजन उपस्थित होते.
यासह कमलबाई चौधरी, प्रियांका चौधरी, कांता चौधरी, जान्हवी चौधरी, विमल बोरसे, सीमा पाटील, रेखा अंभोरे, मीनाक्षी अंभोरे, रत्ना कोळी, वैशाली राणे, अंजली मीना, पुष्पा बोरसे, सुनीता बोरसे, आरती अवचार, ज्ञानेश्वरी अवचार, वैष्णवी अवचार, संगीता पाटील यासह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते.