एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संघ आयोजित ” अवयवदान सर्वश्रेष्ठ दान ” ह्या विषयावर सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी दिनांक ३० जुलै रोजी मुक्त संवाद साधला .
आज भारतात ५ लक्ष गरजू रुग्णांना अवयवांची गरज असून दर दहा मिनिटाला एकाची प्रतीक्षा यादी मध्ये नोंद होत असल्यामुळे मेंदू मृत होणाऱ्या रुग्णाच्या अवयवदानाची टक्केवारी वाढविण्याची आज गरज आहे .

आज भारतात प्रत्येकी सात नागरिकानंतर एक नागरिक हा ज्येष्ठ नागरिकाच्या संज्ञेत येत असल्यामुळे व सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात हे संघटन संपूर्ण देशात उकृष्ट कार्य करत असल्यामुळे ग्रामीण समाजजीवनात अवयवदानाबद्दल जे गैरसमज , धार्मिक अंधश्रद्धा , भीती , अप्रप्रचार आणि अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी अवयवदूत म्हणून व कुटुंबातील सदस्यांपैकी जर कोणी मेंदू मृत अवस्थेत अवयवदान करणेसाठी पात्र असेल त्यावेळेस संमती देऊन अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातुन ८ गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक हे प्रभावी पणे हातभार लावू शकत असल्यामुळे अवयवदान मोहिमेसाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी केले.
ह्या प्रसंगी संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेल्या पुस्तक वाचनालयाचे उदघाटन डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. सरला विंचूरकर ह्या यकृतदात्या महिलेनेही स्वानुभव विषद करून जिवंतपणी अवयवदान केल्यानंतर तब्येतीवर कुठलाही प्रतिकूल परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले .
सौ . सरला विंचुरकर ह्या यकृतदात्या महिलेचा व वाचनालयासाठी देणगी देणाऱ्याचा सत्कार संघाचे अध्यक्ष अरुण माळी , चिटणीस विनायक कुलकर्णी , उपाध्यक्ष जाधवराव जगताप ह्यांनी केला .
कवी निंबा बडगुजर , सुपडू भांडारकर , पी . जी . चोधरी , गणेश पाटील , नामदेव पाटील , विश्वनाथ पाटील , भगवान महाजन , जगन महाजन , प्रा . शिवाजीराव अहिरराव , जगदीश ठाकूर , कुंदन ठाकूर , आरती ठाकूर , नीलिमा मानुधने ,डॉ प्रशांत पाटील , पदमाकर विंचूरकर ,राहुल शिंदे , शेखर बुंदेले, पवन गवळी ह्यांसह अनेकांची उपस्थिती ह्या प्रसंगी होती.
संघाचे अध्यक्ष अरुण माळी ह्यांनी संघाच्या विविध उपक्रमाबाबत अवगत केले . सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी तर आभार प्रदर्शन निंबा बडगुजर ह्यांनी केले.







