यावल ( प्रतिनिधी ) – शहरात अवैध वाळू वाहतूक गुन्ह्यात खुद्द वाहन मालकांना यावल पोलिसांनी अटक केल्याने कायद्याच्या या दणक्याने राजकारण आणि वाळू प्रकरण चांगलेच तापले आहे.
गेल्या महिन्यापूर्वी यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्राली पकडण्यात आल्या होत्या गुन्हा दाखल होऊन गुन्हा न्यायप्रविष्ट झाला नंतर महसूल,पोलीस आणि अवैध वाळू वाहतूक करणारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती अवैध वाळू वाहतूक करणारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता पो नि सुधीर पाटील यांनी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी आणि मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक दाखल गुन्ह्यात शहरातील दोन ट्रॅक्टर मालकांना काल अटक केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली
याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सत्ताधारी गटातील काहींना चांगलाच कायदेशीर दणका बसला विरोधी गटात समाधान व्यक्त केले जात आहे. नगरपालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने विरोधकांना चांगला कायदेशीर मुद्दा सापडला आहे.
यावल पोलिसांनी काल दोन जणांना अटक केल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याने पुढील कार्यवाही काय? वाहन मालकांना कायदेशीर दणका का बसला? , याबाबतसुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत .