भडगाव तालुक्यातील वलवाडी, वाक रस्त्यावरील घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आता प्रशासनाने कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर शनिवारी मध्यरात्री आणि एक ट्रॅक्टर आज शनिवारी सकाळी ७ वाजता महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
हे डंपर आणि ट्रॅक्टर शासकीय आयटीआय येथे जमा करण्यात आले असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत दि ६ रोजी रात्री १२ वाजता मौजे वलवाडी ता.भडगाव येथे एक अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर हे सुनिल मांडोळे, किरण मैंद,महादू कोळी या पथकाने कारवाई केली. तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर वाक रस्ता येथून दि. ७ रोजी सकाळी ७ वाजता कारवाई करण्यात आली.विवेक महाजन, गितेश महाजन, महादू कोळी, योगेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.