भडगाव तालुक्यात एलसीबीची कामगिरी
भडगाव (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर रविवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांच्या पथकाने पकडून कारवाई केली आहे. हे डंपर भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ.लक्ष्मण पाटील,पो. काँ.जितेंद्र पाटील, पो.कॉ.भूषण पाटील, पो.कॉ.प्रमोद ठाकूर आदींचे पथक जळगाव जिल्ह्याच्या गस्तीवर असताना भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कजगाव जवळ रघुनंदन एकनाथ पाटील यांच्या मालकीचे डम्पर मिळून आले. चालक हिरामण राजू सोनवणे याच्या ताब्यातुन १ डंपर जप्त करण्यात आले. या डंपरमध्ये ०६ ब्रास वाळू मिळून आली. हे वाहन जप्त करून भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.