रावेर तालुक्यात विवरा ते खिर्डी रस्त्यावर पोलिसांची कारवाई
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील विवरा ते खिर्डी रस्त्यावर अवैध गोमांसाची वाहतूक करणारी दुचाकी जात असताना १४ रोजी सकाळी रसलपूर येथील शेख अनिस शेख अय्युब (वय २७) यास निंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास अटक झाल्यावर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी शेख अनिस याच्या ताब्यातून २० किलो गोमांस, कुऱ्हाड, दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी पो.शि. किरण जाधव यांच्या फिर्यादीवरुन निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो. नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे करत आहेत. रावेर न्यायालयाने शेख अनिस यांस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.