सावदा ता. रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील लोहारा येथे अवैध गावठी दारूची भट्टी सावदा पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यानीं उद्ध्वस्त केली आहे.
रावेर तालुक्यातील लोहारा गावात संशयित आरोपी मुशिर नजीर तडवी हा गावापासून जवळच बेकायदेशीर गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती स पो नि देविदास इगोले यांना मिळाली. सावदा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार, हवालदार मेहरबान तडवी, रिजवान पिंजारी, जयराम खोडपे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ठेंगडे, नितीन पाटील, सागर देशमुख यांनी कारवाई करत १० हजार रुपये किमतीची १ हजार लिटर गावठी दारू नष्ट केली संशयित आरोपी मुशीर तडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







