जळगाव जामोद तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बुलडाणा [प्रतिनिधी] – शौचास जाणार्या अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवून चौघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील महाडखेड खुर्द येथे 18 सप्टेंबरला घडली. यात तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
मंदिराजवळ घडला घृणास्पद प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडाखेड खुर्द येथील 15 वर्षीय मुलगी रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर शौचासाठी गेली होती. या मुलीवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने चौघा तरूणांनी या मुलीवर पाळत ठेवली होती. ती येताच चौघांनी तिला गाठले तिा पकडून थेट मरीमातेच्या मंदिराजवळ ओढत नेले. तेथे चौघांनी मिळून या मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर चौघांनी या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून पळ काढला. मुलीने घरी गेल्यानंतर तीची परिस्थिती पाहून घरचे हादरले. त्यानंतर तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व घडलेला प्रकार घरी सांगितला व या घटनेचा उलगडा झाला.
ज्ञानेश्वरने दाबले तोंड
ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे या पस्तीस वर्षीय नराधमाने या मुलीचे तोंडात फडका कोंबून तोंड दाबून धरले व अन्य तिघांना तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे सांगितले यात टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (22 ), सागर मांडोकर, संदिप वसंत जवंजाळ ( 27 ) यांचाही समावेश होता. सर्वांनी आळीपाळीने या मुलीवर अत्याचार केला. कुणी येत आहे का याची संदीप जवंजाळ हा नराधम पाहणी करीत होता.
तिघांच्या मुसक्या आवळल्या
मुलीच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाण्यात येत तिने तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चौघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून, ज्ञानेश्वर, टिल्या, संदिप या तिघांच्या मुसक्या अवघ्या काही तासातच आवळल्या. यातील सागर हा आरोपी फरार असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल. असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहे.