पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : पतीसह मुलाला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय विवाहिता कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा संशयित आरोपी भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याने विवाहितेला पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेला व्हिडीओ कॉल करून अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडले, तसेच तिला चाकूने डोक्यावर व हातावर वार करीत दुखापत केली.
या घटनेबाबत विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहे.