चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात वासनांध बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
सदर कुटुंब गावात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. पीडित मुलीच्या आईला काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. तशात सलाइन लावण्यासाठी घरात जागा नव्हती. त्यामुळे दिराच्या घरी आईला सलाईन लावण्यात आली होती. यामुळे मुलगी घरी एकटी होती. यावेळी नराधम बापाने दारू पिऊन आला. स्वतःच्या मुलीचे तोंड दाबून तिच्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केला. रविवारी रात्री ११ वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या मुलीने हा प्रकार सांगितला.
दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमिनच सरकरली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळून गेला. याबाबत पोलिसात ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.