चाळीसगाव (प्रतिनिधी) – चार दिवसांपूर्वीच घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच शहरात चार वर्षीय मुलीला बिस्किट पुड्याचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली . शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव शहरातील एका चार वर्षीय मुलीला बिस्किटचा पुड़ा घेऊन देतो असे सांगून रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले त्याच्यावर भादवी कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (एवी) व पोस्को कायदा ४, ५ (एम), ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीतेचा दुरचा नातेवाईक असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पो नि के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहेत.