जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावात येथे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना 14 जानेवारी रोजी घडली होती. गुन्हा घडल्याच्या रोजीपासून आरोपी फरार झाला होता त्यामुळे त्याच्या शोधात पोलिसांनी मध्यप्रदेशात पथक रवाना केले होते. अत्याचार करणाऱ्या आरोपीस 48 तासात नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.
25 जानेवारी रोजी महिलेने फिर्याद दिली की, 14 रोजी दुपारी 12 वा. चे सुमारास यातील आरोपी नामे परमानंद कैन्हैया गोरे (वय 24 रा. गुलई ता. खालवा जि.खंड वा राज्य मध्य प्रदेश हल्ली मुक्काम साईनगर मन्यारखेडा ता. जि. जळगाव) याने माझी अल्पवयीन मुलगी (वय 4 वर्ष) हिला खेळण्याच्य बहाण्याने तो रहात असलेल्या पत्र्याच्या खोलीत बोलावुन घेवुन लैगिक अत्याचार केला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे सासरे हे आजारी असल्याने तसेच त्यांची समाजात बदनामी होईल या भितीपोटी त्यांनी विचारविनीमय करुन उशिराने 25 रोजी तक्रार दिली आहे. सदरची घटना 14 रोजी घडली असल्याने आरोपी 14 रोजी पासुन गावाकडे गुलई (ता. खालवा जि. खंडवा राज्य मध्य प्रदेश) येथे पळुन गेला होता. गुन्हा दाखल झाले नंतर आरोपीचे शोधासाठी पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी सौमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार एक तपास पथक नेमुन सदर पथकास आरोपीचे शोधासाठी रवाना केले होते. तपास पथकाने मध्य प्रदेश येथील संबधीत पोलीसांची मदत घेवुन तसेच तांत्रीक स्वरुपाचा तपास करुन आरोपीची माहीती काढुन त्यास शिताफिने 48 तासांचे आत ताब्यात घेतले आहे. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास 2 फेब्रुवारी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झाली आहे.