जळगाव ;- तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी आज अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, साहिल जावेद शेख (वय-२२) याने १४ वर्षांच्या मुलीला ७ एप्रिल २०२१ रोजी पळवून नेले. पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी याने अल्पवयीन मुलीला पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घेवून गेला. जीवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्यावर अत्याचार केला. अशी माहिती बाल कल्याण समिती जळगाव यांच्या समोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यानुसार संशयित आरोपी साहिल जावेद शेख यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.