चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार, पीडिता गरोदर

भडगाव । प्रतिनिधी: भडगाव तालुक्यात नातेसंबंधांना काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली असून, २२ वर्षीय तरुणाने त्याच्या १३ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर गेल्या वर्षभरात वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पा अमानुष कृत्यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात ही घटना घडली. आरोपी तरुणाने नात्याचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत आपल्या सख्ख्या चुलत बहिणीवर सातत्याने अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपासून मुलीच्या प्रकृतीत बिधाड जाणवू लागल्याने तिला तातडीने भडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न होताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावाविरोधात बलात्काराचे गंभीर कलम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









