सलग दुसऱ्यादिवशी बलात्काराची घटना उघड
जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरात एकामागून एक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असून गुरुवारी जळगावात बलात्काराची घटना ताजी असतांना जळगाव शहरात पुन्हा दुसर्या दिवशी बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नुर मोहम्मद शेख लतीफ (वय ४०, रा.अक्सानगर) याचे पिडीत महिलेसोबत काही वाद झाले होते. त्याबाबत महिलेने नुर मोहम्मद विरुध्द तक्रार देण्याची तयारी केली होती. हीच माहिती मिळाल्यानंतर २० जुलै २०२४ रोजी नुर मोहम्मद हा रात्री ११.४५ वाजता महिलेच्या घरी आला, तेव्हा महिला घरी एकटीच असताना, माझ्या विरुध्द तक्रार केली म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेवर अत्याचार केले. तसेच या प्रकरणी जर कोणाला सांगितले तर, महिलेच्या पतीसह मुलांना ठार मारण्याची धमकी नुर मोहम्मद याने दिली, असे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री पिडीत महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका महाविद्यालयाच्या आवारात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महाविद्यालय परिसरातील एका गल्लीतून पिडीत मुलगी जात असताना, तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.