जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्यास असलेल्या एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र वसंत कोळी (वय ४४, रा. अट्रावल ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. ते आई, भावासह कुसुंबा येथे कामानिमीत्त वास्तव्याला आहे. ते दि. २७ रोजी साकेगाव येथे बहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेले होते. (केसीएन)तेथून परतल्यानंतर आज बुधवारी सकाळी आई आणि भाऊ कामाला गेले असतांना घरात राजेंद्र कोळी यांनी घराच्या छताला साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकवून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दुपारी १२ वाजेपूर्वी घडली.
घरमालक दरवाजाच्या कामानिमीत्त आले असता त्यांना राजेंद्र कोळी हे गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने त्यांचे भाऊ प्रवीण कोळी यांना कळविले. मयत राजेंद्र कोळी यांचे लग्न होऊन फारकती झाली होती. तेव्हापासून ते फारसे कुणाशी बोलत नव्हते. एमआयडीसीतील एका कंपनीत ते रोजंदारीने काम करीत होते, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.