जळगाव (प्रतिनिधी ) ;- नोकरीमध्ये कामाच्या व्याप वाढल्याने या तणावाला कंटाळून पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली असून यावेळी मयत व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे . प्रदिप धनलाल कापुरे (शिंपी) वय ४५ असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान बोगस कागदपत्रे सादर करून एकाने कर्ज मिळविले होते. त्यादबावाखाली प्रदीप शिंपी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताची पत्नी आणि बहिणीने पत्रकारांशी बोलतांना केला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मयूर कॉलनी पिंप्राळा येथील रहिवाशी प्रदीप कापुरे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात . मुथ्थूट होमफिन (इंडिया) लिमिटेड शाखा जळगाव येथे दि. 1 नोव्हेंबर 2017 पासुन क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत होते . प्रदीप शिंपी यांनी आज सकाळी गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नी या दिसून आले. यावेळी त्यांनी नवऱ्याचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पत्नी ,मुलगा कुणाल ,मुलगी यज्ञा ,आई सुचिता, 3 बहिण , १ भाऊ असा परिवार आहे.
काय आहे सुसाईड नोटमध्ये
मी स्वतः प्रदीप धनलाल शिंपी वय 45 वर्ष राहणार मयूर कॉलनी,पिंप्राळा जळगाव 425001 मी मुथ्थूट होमफिन (इंडिया) लिमिटेड शाखा जळगाव येथे दि. 1 नोव्हेंबर 2017 पासुन क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे मागील एक ते दीड वर्षापासून माझ्यावर अतिरिक्त कामाचा लोड आहे. खुप आडचणीचा सामना करत मी . मागील 6 महिन्यापासून खुप हताश व निराश होतो. त्यात वारंवार नोकरी जाईल याचा धोका PIP देण्यात येईल ,ब्राच कॉस्टिंग असे सर्व माझ्यावरच कमी मेन पावर मध्ये खूप जबाबदारी व वेगवेगळे काम अशा विविध अडचणींना कंटाळून मी स्वतः टोकाचे पाऊल उचलत आहे.म्हणून मी आत्महत्या करीत आहे मी खूपच तणावात आहे त्यात माझ्यावर अतिरिक्त औरंगाबाद शाखेची जबाबदारी दि. 20 मे 2021 देण्यात आली ही जबाबदारी अचानक पणे देण्यात आली त्यामुळे मी खूपच गोंधळून गेलो.आजारी पडलो सुट्ट्या घेतल्या त्यात आईची तब्येत खराब बहीण आजारी मी परत 7 जुन 2021 ड्युटी जॉईन केली. कामाच्या अतीताण जास्त जबाबदारी वर्क लोड वेगवेगळे काम तसेच औरंगाबाद शाखेची जबाबदारी याचा खूप दबाव वाढल्याने व स्टेस आल्याने हे सर्व मला करावे लागले. म्हणून हा निर्णय घेत आहे.मी कंपनीचा स्टाफ मेम्बर आपणा सर्वांची माफी मागतो. खूपच स्ट्रेस आल्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता. जळगाव ब्रांचसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझे कंपनी व नोकरीवर माझे खूप प्रेम आहे. माझ्या परिवार मला कधीच माफ करणार नाही. पण त्यांना तुम्ही सर्व जगण्याचे बळ द्या सहकार्य करावे ही कळकळीची विनंती. तसेच इतर काही फायदे किंवा सहकार्य ते माझ्या परिवारास मिळून द्यावे जे मला माहिती नाही, माझ्या परिवारात पत्नी सुचिता मुलगा कुणाल, मुलगी यज्ञा व आई आहे. माझ्या फॅमिलीला सहकार्य करा व मार्गदर्शन करा इतर माझे खाजगी क्लेम व पुढील कागदपत्रांचे काम होण्यास मदत करा. अशी विनंती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये नमूद केली आहे.