जळगाव शहरातील मुन्सिपल कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील म्यून्सिपल कॉलनी येथील ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवार दि. १८ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
पराग अनिल ठोंबरे (वय-३० रा. मुन्सिपल कॉलनी, रामानंद नगर परिसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुन्सिपल कॉलनी येथे पराग ठोंबरे हा आई लता, पत्नी शितल, तीन वर्षाचा मुलगा शंभू आणि एक विवाहित बहीण यांच्यासह वास्तव्याला होता. फोटोग्राफीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शुक्रवारी दि. १७ मे रोजी रात्री परागने कुटुंबासह जेवण केले व झोपला. त्यानंतर मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता त्याची आई लताबाई यांच्या लक्षात आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला.
यावेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्याला खाली उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.