यावल ( प्रतिनिधी )– किनगावात अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असून यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या गावातील ही चौथी घटना आहे.
किनगाव येथील त्रिशिला अडकमोल (वय१४, ) इत्तया ९वीत शिकणारी किनगावचे उपसरपंच शरद अडकमोल यांची मुलगी होती . तिने आज दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली या मुलीची आई बाहेरगावी गेल्याने ती तिच्या वडीलासोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला घरात एकटीच होती. बऱ्याच वेळेने बाहेर दिसली नाही हे पाहुन शेजारी राहणाऱ्यानी तिला आवाज दिला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा आतुन बंद केला असल्याने ग्रामस्थांनी भिंतीवरून घरात उडी घेतली. त्यावेळेस त्रिशिला ही घरातील छतास गळफास घेवुन मृत अवस्थेत आढळुन आली.
यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पो उ नि जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ विजय पाचपोळे करीत आहेत .किनगाव गावात १५ दिवसातील आत्महत्या करण्याची ही चौथी घटना असून, आत्महत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात हा विषय चर्चचा बनला आहे .