जळगाव (प्रतिनिधी ) ;- पती व सासरच्या छळाला कंटाळून तालुक्यातील आव्हाने येथील ३१ वर्षीय विवाहितेने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरकडील मंडळीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील विविध कारणांवरून विवाहिता माधुरी हिचा सासरच्या मंडळींसह पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासूबाई दिलीप जाधव, जेठ चंद्रकांत दिलीप जाधव सर्व रा. आव्हाने ता. जि. जळगाव अशांनी तिला मारहाण, शिवीगाळ, शारीरिक व मानिसिक छळ केल्याने या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या पित्याने तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.