जळगाव तालुक्यातील रिधुर येथील घटना ; अट्रावल येथे अंत्यसंस्कार
जळगाव (प्रतिनिधी ) ;- नैराश्यातून एका १८ वर्षीय मुलीने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रिधुर येथे आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नंदिनी कडू तायडे रा. १८ रा. अट्रावल ता. यावल असे मयत तरुणीचे नाव आहे. दरम्यान तिच्यावर आज मूळगावी अट्रावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील अट्रावल येथील नंदिनी तायडे हि मामा मनोहर कोळी यांच्याकडे ९ रोजी आली होती. आज १० रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ती घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलीस पाटील प्रमोद पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास अनिल फेगडे, दिनेश पाटील हे करीत आहे.