चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : अभ्यासाला लायब्ररीत जातो, असे सांगत घराबाहेर पडलेल्या १९ वर्षीय तरूणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मेहूणबारे येथील प्रकाश चौधरी यांचा मुलगा दर्शन प्रकाश चौधरी (वय १९) हा अभ्यासासाठी लायब्ररीत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. उशिपर्यंत तो घरी न परतल्याने कुटूंबियांनी त्याच्या मोबाईवर संपर्क केला असता, तो बंद असल्याचे दिसून आले. यामुळे कुटूंबियांनी शोध घेतला असता प्रकाश चौधरी यांच्या शेतातील घराला आतून कडी लावलेली आढळून आली.
कुटूंबियांनी कडीकोयंडा तोडला असता घरामध्ये दर्शन हा छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या वेळी कुटूंबियांनी मोठा अक्रोश केला.