जळगाव : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सहा प्रस्तावांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दर आठवड्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून मदत अनुदान प्रस्ताव सादर केले जातात. गेल्या दोन तीन महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून बरेच प्रकरणात मदत प्रस्ताव सादर झालेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक मदत अनुदान प्रस्ताव मान्यतेसाठी घेतली जात आहे.
त्यानुसार बुधवार ९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीच्या झालेल्या बैठकीत ९ मदत प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी सहा पात्र प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यात शरद खंडू पवार, कवठळ, छगन चत्रु राठोड पोखरी ता. धरणगाव,मंगलसिंग विजयसिंग पाटील वडगाव लांबे ता. चाळीसगाव, नरेंद्र विठ्ठल बलक शेंगोळा, सागर राजेंद्र सोमवंशी चिंचोली पिंप्री ता. जामनेर, रविंद्र यशवंत पाटील जवखेडा ता. अमळनेर असे आहेत.
तसेच दोन मदत अनुदान प्रस्ताव पडताळणी अंती अपात्र ठरविण्यात आले आहेत.