चाळीसगाव ;- तालुक्यातील पातोंडा येथील ३० वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश सुरेश पाटील (वय- ३० रा. पातोंडा ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी दिनेश पाटील याने सोमवार, ७ रोजी उघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.हे.कॉ. संदीप तहसीलदार हे करीत आहेत.