चाळीसगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिलखोडयेथील एका 25 वर्षीय तरुणाने दारूच्या दुकानातचं फाशी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको केला .
कुणाल माळी हा तरुण गावातील देशी दारूच्या दुकानात गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होता. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या या तरुणाने दारूच्या दुकानातच फाशी घेतल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे, या तरुणाने आत्महत्या का केली याची अजून खात्रीदायक माहिती समोर आली नसून घटना स्थळी मात्र मेहुणबारा पोलिस यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.