भडगाव (प्रतिनिधी ) – ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतावर कर्ज काढलेल्या शेतकऱ्याने कर्ज फेडले जा नसल्याने आणि दोघांच्या सतत पैशांच्या मागणीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या करून शेतकऱयाने आपले जीवन संपविल्याची घटना भडगाव येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाल्मीक वामन पाटील (वय-५०) रा. चुंचाळे ता. पाचोरा ह.मु. भडगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
वाल्मिक पाटील यांनी चुंचाळे गावातील रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील या दोघांनी मयत वाल्मीक पाटील यांच्या शेतातवर ट्रॅक्टरचा कर्जाचा बोजा बसवलेला होता. दोघांनी ट्रॅक्टर साठीचे घेतलेले कर्जाची परत फेड न केल्याने वाल्मीक पाटील यांनी तगादा लावला होता. दरम्यान, रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील यांच्यांकडे पैशांसाठी विनवण्या केल्या. त्यांनी कुठेलेही पैसे भरलेले नाही. या त्रासाला कंटाळून वाल्मिक पाटील यांनी रतन बळीराम पाटील यांच्या बाळद बुद्रुक शेत शिवारात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. आरोपी रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील दोन्ही रा. चुंचाळे ता. पाचोरा जि.जळगाव ह.मु. गाडगेबाबा नगर, पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहे.