जळगाव;- दहावीच्या अभ्यासाच्या भीतीपोटी तणावाखाली येत एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे जुने भगवान नगर भागात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिप सुरेश रावतोडे (वय-१५) रा.जुने भगवान नगर जळगाव हा यंदा दहावीच्या वर्गात गेला होता. घारात आईवडीलांसह राहतो. वडीलांचे इलेक्ट्रिकचे कामे करतात. दिप हा यावर्षी दहावीत गेला होता. अभ्यासाचा ताण घेतल्याने भीतीपोटी त्याने रात्री पंख्याला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी वडील त्याला उठवाला गेले असता तो पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. अभ्यासाच्या भीतीने मुलाने आत्महत्या केल्याची माहिती वडील सुरेश रावतोडे यांनी सांगितले. चंदू तुकाराम रावतोडे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.