जळगाव (प्रतिनिधी ) – यथील जुने जळगाव परिसरात रामपेठ तेली चौक , भट गल्ली परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजय नामदेव खडके वय ३१ असे मयत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी घरात कुणीही नसताना घराच्या दरवाजा बाहेर त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तो आपल्या चुलत भावासोबत राहत असल्याचे कळते . याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक अभंजित सैंदाणे करीत आहे .