जळगाव (प्रतिनिधी) -विजेचे कनेक्शन महावितरण कंपनीकडून दिले जात नसल्याने शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वताला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने याठिकाणी खळबळ उडाली होती.
योगराज प्रल्हाद पाटील (रा. सात्री ता.अमळनेर) असे या शेतकर्याचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री येथील रहिवासी योगराज पाटील हे शेतकरी असून त्यांच्याकडे दहा बिगे शेती असून शेतीत मक्याचे पीक लावले आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावे त्यासाठी दहा महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा कारुनही ते मिळाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते. तसे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असतानाही कनेक्शन दिले गेलेले ना. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला कंटाळून योगराज पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.