जळगाव (प्रतिनिधी ) चिंचोली येथील एका बँकेचे एटीएम मशिनमधून तीन चोरटयांनी पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून तीन चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे आरबीएल बँक असून या बँकेच्या शेजारीच एटीएम मशीन लावले आहे. याठिकाणी गोपाल बाविस्कर हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असून सोमवारी सकाळी ९ वाजता गोपाल बाविस्कर हा सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे कामावर असला. यावेळी त्याने एटीएम मशीन चेक केले असता, मशीनरचा लॉकचा दरवाजा उघडा दिसला. बँकेचे मॅनेजर सोहेल मुख्तार देशमुख यांना याबाबात सांगितले. .
मॅनेजर सोहेल देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेचे मशीनचा दरवाजा तोडून, नुकसान करुन तसेच चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदतसर काजी हे करीत आहेत.