रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे शासकीय उपक्रम
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) – खेडी बुद्रुक येथील अतिक्रमित जागेवर राहत असलेल्या एकूण ६६ लोकांपैकी ३९ लोकांनी शासनाची लागत असलेली शासकीय नजराणा रक्कम भरलेली असल्याने त्यांना तात्काळ सातबारा उतारे वाटप करण्यात आले. यासह उर्वरित २२ लोकांचे नजराणा रक्कम भरण्याची बाकी असल्याने सदर भरणा केल्यानंतर ज्या लोकांना सुद्धा त्वरित त्यांची जागा त्यांचे नावावर करणे कामी कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी आ. चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील बरेच गरीब कुटुंब व निवाऱ्यापासून वंचित असल्याने शासनाच्या जागा नियमाकुल करून सातबारा त्यांचे नावावर होण्यासाठी व त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. तसेच रावेर तालुक्यात काही दिवसापूर्वीच सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये खिर्डी बुद्रुक येथील नागरिकांनी त्यांच्या राहण्याचा प्रश्न उपस्थित केला व आम्हाला हक्काचे घर मिळावे यासाठी सदर आढावा बैठकीमध्ये मागणी केली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ हे अतिक्रमित जागा शासनाचे नियमानुसार अतिक्रमणधारकांच्या नावे नियमाकुल करणे कामी सूचना दिल्या. कार्यक्रमात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दिनेश पाटील उर्फ छोटू पाटील, पंकज कोळी उपस्थित होते. रावेर अपर तहसीलदार मयूर कळसे यांनी प्रशासकीय कामांची योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाप्रसंगी ऐनपूर मंडळ अधिकारी जी. एन .शेलार, खिर्डी मंडळ अधिकारी प्रवीण कुमार नेहेते, खिर्डी तलाठी जोशी, बलवाडी तलाठी निलेश पाटील, कोतवाल शारदा पाटील , शिवसेना तालुका उपप्रमुख तथा खिर्डी बुद्रुक माजी उपसरपंच विनोद पाटील, शिवसेना पदाधिकारी घनश्याम पाटील, शिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सदस्य निळकंठ पाटील, अतुल पाटील, धीरज पाटील, शब्बीर मिस्तरी, शेख सलमान, भैय्या पाटील, जयंत पाटील, शेख सलमान ,शेख कयूम जावेद पठाण ,जाकिर पिंजारी, विनोद कोळी ,आदीसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी केले तर आभार कोतवाल शारदा पाटील यांनी मानले.