चाळीसगाव येथे मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आजच्या पिढीचा विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान युगाच्या स्पर्धेसाठी सक्षम असला पाहिजे. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात येणाऱ्या नव्या पिढीसाठी हा अभिनव उपक्रम देशात राबविला असून “अटल टिंकरिंग लॅबच्या” माध्यमातून नव्या युगाचा विद्यार्थी तंत्रज्ञानासाठी सक्षम करण्यासाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे. आज अभिनव शाळेच्या सभागृहात “अटल टिंकरीग लॅब” करीता तालुक्यातील मुख्याध्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी गटविकास अधिकारी नंदुकुमार वाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले खासदार उन्मेश दादा हे उच्च शिक्षित असल्याने त्यांची माझ्या तालुक्यातील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असला पाहिजे ही तळमळ आम्हाला ऊर्जा आणि बळ देत आहे. यावेळी उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या सस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील , गटशिक्षणाधिकारी विलास भोई, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय वाघ, विस्तार अधिकारी श्री.सावंत, अभिनव शाळेचे मुख्याध्यापक अरविंद वाबळे, भैय्यासाहेब वाघ , पारस परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी तर आभार संजय वाघ यांनी मानले. सूत्रसंचालन पारस परदेशी यांनी केले. यावेळी स्मिता गोडके, मनीषा तंवर यांनी मुख्याध्यापकाना अटल लॅब बाबत सविस्तर माहिती दिली.








