तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत केली कारवाई ; पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
जळगांव(प्रतिनिधी ) ;-कोल्हे हिल्स परिसरात फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी बोलावून त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा पळवून नेणाऱ्या 3 भामट्याना तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केल्याची कारवाई करून कॅमेरा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षकांनी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत कौतुक केले आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्टेशन गु र नं २३२/२०२१ भा दं वि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी सिध्देश कृष्णा महाजन वय १६ रा प्लॉट नं ४९९ जोशी पेठ रविफोटो स्टुडिओ जळगांव यास फोटो काढणे करिता दिनांक ०८/८/२०२१ रोजी सकाळी १०.०० बाजेचे
सुमारास कोल्हे हिल्स परिसर जळगांव येथे बोलावुन त्यास अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन त्याचे ताब्यातील सुमारे ५०,०००/- रुपये किमतीचा एक कॅनॉन कंपनीचा काळया रंगाचा ८०डी १८-१३५ एम एम लेन्स हा हिसकावुन जबरी चोरी केली असले बाबत दिनांक ०८/८/२०२१ रोजी १७.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,
,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा सो, जळगांव विभाग यांचे सुचना ब मार्गदर्शन प्रमाणे मा पोलीस निरीक्षक श्री रविकांत सोनवणे जळगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी पो हे का सतिश हाळणोर,पो हे कां अनिल फेगडे ,पो ना
सुशिल पाटील,पो ना विजय दुसाने, पो ना ललित पाटील, पो ना दिनेश पाटील पो कॉ दिपक कोळी चालक पो कॉ प्रविण हिबराळे यांचे पथक तयार केले. सदर पथकातील कर्मचारी यांनी गुन्हयातील आरोपी बाबत गुप्त बातमीदार मार्फत बातमी काढुन यातील मुख्य आरोपी १)स्वराज संजय ठाकुर वय
१९ रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार जळगांव यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेला कॅमेरा हस्तगत करण्यात आला तसेच त्याचे साथीदार १) अजय राजु चव्हाण वय २० (२)रुपेश गणेश साळवे वय १८ दोन्ही रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार जळगांव यांना ताब्यात
घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली असुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला कॅमेरा हस्तगत करण्यात येवुन सदरचा गुन्हा उघडकोस आणला आहे.आरोपी १)स्वराज संजय ठाकुर वय १९ रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार जळगांव २) अजय राजु चव्हाण
वय २० (३)रुपेश गणेश साळवे वय १८ दोन्ही रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार जळगांव यांना गुन्ह्याकामी अटक करण्यात आली आहे.
तरी सदर गुन्हा घडले पासुन २४ तासात उडकीस केलेला आहे.सदर कामगिरी बाबत मा पोलीस अधीक्षक सो यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हे कॉ १०४५ अनिल बळीराम फेगडे हे करित आहेत.