जळगाव (प्रतिनिधी ) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाच्या मोबाईल लांबविल्याप्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,
प्रशांत गोरख वाघोडे (वय-२५) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हे २२ फेब्रुवारी रोजी ममुराबाद ते जळगाव रोडवरील म्हाळसादेवीराच्या बोर्डापासून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा रस्ता आडवून महागडा मोबाईल हातातून हिसकावून नेला होता. त्यानंतर वाघोडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले तपास करित असताना, संशयित मोबाईल चोरटा हा गणपती नगरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ संदीप साळवे, पोना. विजय पाटील, अविनाश देवरे यांनी शुक्रवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी राकेश गोकूळ राठोड रा. गणपती नगर, जळगाव या याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याचबरोबर त्याने मोबाईल चारीचा गुन्हा हा साथीदार विक्की उर्फ माया गणेश शिंदे याच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.